Gopichand Padalkar । ‘छगन भुजबळ तुमचा बाप…’, आमदार गोपीचंद पडळकर भडकले

Chhagan Bhujbal

Gopichand Padalkar । मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या उपस्थितीमध्ये बीडमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त राज्यातील ओबीसी नेते बीडमध्ये येत आहेत. मागच्या काही दिवसापासून मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामधील संघर्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान मराठा समाजाचे आंदोलकी भुजबळांविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलकांकडून भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आता या मागणीवर भाजप आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पलटवार केला आहे.

Indapur News । मोठी बातमी! इंदापूरसह अनेक भाग गंभीर दुष्काळ म्हणून जाहीर करण्यासाठी उपोषण

काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

“भुजबळ तुमचा बाप आहे. उगाच विरोधातील घोषणा देऊन काय होणार आहे?” असं प्रत्युत्तर पडळकर यांनी दिले आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याच्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहेत. या सभेपूर्वी मराठा आंदोलनकांनी छगन भुजबळ मुर्दाबाद. भुजबळ चले जावोच्या घोषणा दिल्या आहेत. त्याचबरोबर ओबीसींची सभा घ्यायची असेल तर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि मग सभा घ्यावी असा अहवान मराठा आंदोलकांनी केलं.

Crime News । हृदय पिळवून टाकणारी घटना! 14 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, दगडाने चेहरा ठेचला अन्…

बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.बीडमध्ये ओबीसी मेळावा होत असून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे सभेला का येणार नाहीत? असा सवाल देखील पडळकर यांना विचारण्यात आला. यावेळी पडळकर म्हणाले, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे मोठे नेते आहेत एखाद्या सभेला नाही आले म्हणून त्यांचं काम कमी होत नाही. असं ते म्हणाले आहेत.

Milind Deora । बिग ब्रेकिंग! निवडणुकांपूर्वीच काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला राजीनामा

Spread the love