Manoj Jarange Patil । मनोज जरांगेंच्या मुंबईतील मोर्चाबाबत संभाजीराजेंचे सर्वात मोठे वक्तव्य!

Sambhajiraje Chatrapati

Manoj Jarange Patil । सध्या राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांचा विराट मोर्चा 20 जानेवारी रोजी मुंबईत धडकणार आहे. दरम्यान या मोर्चाच्याआधीच संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Accident News । भीषण अपघात! भरधाव दुचाकीने आईसह सहा महिन्याच्या चिमुरड्याला उडवलं

मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाने प्रश्न सुटेल का? असं संभाजीराजे छत्रपती यांना विचारण्यात आले. यावेळी बोलताना संभाजी राजे छत्रपती म्हणाले की, मराठा समाज हा शांततापूर्व मोर्चे काढतो. मात्र असंतुष्ट लोक सगळीकडे असतात. सरकार टिकणार आरक्षण देणार असं म्हणतायेत तर नेमकं काय करणार आहे? हे सरकारने२० तारखेच्या आत सांगावं असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.

Gopichand Padalkar । ‘छगन भुजबळ तुमचा बाप…’, आमदार गोपीचंद पडळकर भडकले

त्याचबरोबर मुंबई या ठिकाणी 20 जानेवारीला जरांगेंचा मोर्चा दाखल होणार आहे. याबाबत देखील संभाजी राजे छत्रपती म्हणाले, जरांगेंचं मत आहे की आम्ही लिहून घेतल आहे मात्र हे सरकार पाळत नाही. त्यामुळे सरकारने सांगायला हवा की आम्ही असं काही केलं नाही. राज्य सरकारने निमंत्रित केलं तर बोलेन पण मला यामध्ये पडायचं नाही. हा विषय दिवसेंदिवस किचकट होत चालला आहे. सरकारने एकदाच तज्ञ, अभ्यासू लोकांना एकत्र करून समिती स्थापन करावी. एकदाचा विषय संपवायला हवा असं ते म्हणाले आहेत.

Indapur News । मोठी बातमी! इंदापूरसह अनेक भाग गंभीर दुष्काळ म्हणून जाहीर करण्यासाठी उपोषण

Spread the love