Student Drowned In Water । हृदयद्रावक! पोहण्याच्या नादात गेला मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा जीव

Student Drowned In Water

Student Drowned In Water । अहमदनगर : सुट्टीच्या दिवशी अनेकजण आपल्या कुटुंबियांसोबत, मित्रांसोबत किंवा एकटे फिरायला येतात. अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत जिथे तुम्ही त्या ठिकाणी फिरायला जाऊ शकतात. पण जर तुम्ही फिरायला जात असाल तर स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कारण अनेकजण आनंदाच्या भरात सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करत नाहीत आणि एक चूक आपल्या जीवावर बेतते. (Latest marathi news)

Manoj Jarange Patil । मराठ्यांचा सात बारा पक्का झाला, नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील

सध्या अशीच एक घटना घडली आहे. अहमदनगरमधील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी 26 जानेवारी रोजी सुट्टी असल्याने 15 विद्यार्थी फिरण्यासाठी पवना धरण (Pavana Dam) परिसरात गेले होते. (Student Drowned Water In Ahmednaga) ते मावळच्या पवना धरण परिसरातील ठाकुरसाई गावाच्या हद्दीमध्ये टेंट परिसरात पर्यटनासाठी गेले होते पण हेच त्यांच्या अंगलट आले आहे. पवना धरणात जिल्ह्यातील लोणी प्रवारा कॉलेजमधील मेडिकलच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे.

Viral Video । एका सेकंदाचाही उशीर झाला असता, तर पिता-पुत्रांचा जीव गेला असता, पाहा अपघाताचा भयानक व्हिडीओ

मनिष शंकर शर्मा बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. चार विद्यार्थी पवनाधरणाच्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात गेले पण त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यापैकी दोघेजण पाण्यात बुडू लागले. यावेळी इतर मित्रांनी आरडाओरडा केला. स्थानिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण यात एकाचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Pankaja Munde । पंकजा मुंडे यांचे मराठा आरक्षणावर मोठे भाष्य, जरांगे पाटलांना दिला मोठा सल्ला; म्हणाल्या, “आता तुम्ही…”

Spread the love