Vinod Patil । याचिकाकर्ते विनोद पाटलांनी केलं स्पष्ट, “कोणताच निर्णय झाला नाही, विनाकारण..”

Vinod Patil

Vinod Patil । मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा समाजामध्ये (Maratha reservation) उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते जीआर स्वीकारल्यानंतर रात्री अंतरवाली सराटीत पोहोचले. पण मराठा अध्यादेशाला ओबीसी समाजाने विरोध केला आहे. (Latest marathi news)

Student Drowned In Water । हृदयद्रावक! पोहण्याच्या नादात गेला मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा जीव

यावर आता मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil on Maratha Reservation) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ” मराठा समाजाला मागच्या दाराने ओबीसी आरक्षणात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं म्हणणं चुकीचं असून एक मंत्री म्हणून भुजबळांनी असे बिनबुडाचे विधानं करु नये. (Vinod Patil vs Chhagan Bhujbal) त्यांनी आपल्या छातीवर हात ठेवून सांगावं, खरोखरच मराठा ओबीसीमध्ये आला आहे का?” असा सवाल विनोद पाटील यांनी भुजबळांना (Chhagan Bhujbal) विचारला आहे.

Manoj Jarange Patil । मराठ्यांचा सात बारा पक्का झाला, नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील

विनोद पाटील पुढे म्हणाले की,”खरोखर ५४ लाख नोंदींनुसार प्रत्येकी ४ जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे का? तुम्हाला सर्व माहिती आहे, विनाकारण समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासंबंधी कोणताच निर्णय झाला नाही. सर्व मराठ्यांना अजूनही आरक्षणाचा लाभ मिळाला नसल्याने विनाकारण न्यायालयाची भाषा का करता? असा देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

Viral Video । एका सेकंदाचाही उशीर झाला असता, तर पिता-पुत्रांचा जीव गेला असता, पाहा अपघाताचा भयानक व्हिडीओ

Spread the love