IPL 2024 । 22 मार्चपासून आयपीएलच्या (IPL) सतराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आयपीएल ही क्रिकेटप्रेमींसाठी जणू काही एखाद्या उत्सवाप्रमाणे असते. आयपीएलचे सामने पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी दूरदूरवरून येत असतात. यंदा लखनऊ सुपर जायंट्स (LSG) चांगल्या फॉर्म आहे. अशातच संघाला सर्वात मोठा धक्का बसला आहे, कारण संघातील स्टार खेळाडूला दुखापत झाली आहे. (Lucknow Super Giants)
Sharad Pawar । ‘…त्यांना त्यांची जागा दाखवणार’; शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका
संघातील मयंक यादवने (Mayank Yadav) आपल्या गोलंदाजीमुळे सर्वांना प्रभावित केले आहे. पण आयपीएल हंगामात सर्वात वेगवान चेंडू टाकणारा मयंक यादव जखमी झाला आहे. नुकत्याच झालेल्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या (LSG vs Gujarat Titans) सामन्यात तो केवळ एकच षटक टाकू शकला. एका षटकानंतर तो मैदानातून बाहेर पडला तो परत मैदानात आलाच नाही. यामुळे संघाला मोठा धक्का बसला आहे.
Lok Sabha Election । मतदारांसाठी शानदार ऑफर! ‘…. तर हॉटेलमध्ये मिळणार डिस्काउंट’
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दुखापतीमुळे मयंक यादव दिल्लीकडून खेळताना रणजी ट्रॉफीतून बाहेर होता. मयंक त्याच्या करिअरमध्ये पायाची दुखापत आणि हॅमस्ट्रिंग दुखापतीने देखील त्रस्त राहिला आहे. त्याने आयपीएल कारकिर्दीला पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात सुरुवात केली. यंदाच्या हंगामात त्याने टाकलेल्या वेगवान चेंडूमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलाआरसीबीविरुद्ध मयंकने १५६.७ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता.