Lok Sabha Election । महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका (Lok Sabha Election in Maharashtra) पार पडणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. यंदा नवीन मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. उमेदवार मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. अशातच आता निवडणूक आयोगाने (Election Commission) आणखी पाऊल टाकले आहे. (Latest marathi news)
उत्तरखंड निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी एक शानदार ऑफर सुरु केली आहे. १९ एप्रिल रोजी मतदानाचा टक्का वाढला तर २० एप्रिल रोजी हॉटेलमध्ये २० टक्के डिस्काउंट (Discount in hotel) देण्याचा प्रस्ताव दिला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त विजयकुमार जोगदंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. उत्तराखंडमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी संघटनांशी चर्चा सुरु असून हॉटेल असोशिएशनसह इतर संघटनांपुढे हा प्रस्ताव मांडला असल्याचे जोगदंडे यांनी सांगितले.
इतकेच नाही तर निवडणूक आयोगाने निवडणूक कामासाठी असणाऱ्या कर्मचारी आणि सुरक्षा दलासाठी दोन हेलिकॉप्टर तैनात केले असून जोपर्यंत निवडणुकीसाठी काम करणाऱ्या टीमचे कामकाज संपणार नाही, तोपर्यंत हे हेलिकॉप्टर तैनात असतील. वैद्यकीय कारणासाठीदेखील या हेलिकॉप्टरचा वापर केला जाईल.
Gadchiroli News । मोठी बातमी! पोलिसांना मोठे यश, दोन महिलांसह तीन नक्षलवाद्यांना अटक