Manoj Jarange Patil । आरक्षणाबाबत महत्वाची बातमी! मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यातून केली सर्वात मोठी घोषणा!

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । पुणे : मागील काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी (Maratha reservation) चांगलेच आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात नुकतेच ते पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या वेगवेगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. बैठकीदरम्यान, मराठा आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली आहे. (Maratha reservation protest)

Nashik Crime । नाशिक हादरलं! तलवारी नाचवत भरवस्तीत टोळक्याने केलं फायरिंग; पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

“समाजाने ही निवडणूक हातात घेतली असून समाज ज्याला पाडायचं आहे त्याला पाडेल. आरक्षण हेच माझं ध्येय आहे. मी त्यावर ठाम आहे. या सरकारने मला खूप त्रास दिला आहे. ज्याप्रकारे उपमुख्यमंत्र्यांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत. आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला आहे ते त्यांना या निवडणुकीत खूप जड जाणार आहे,” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Gadchiroli News । मोठी बातमी! पोलिसांना मोठे यश, दोन महिलांसह तीन नक्षलवाद्यांना अटक

“सात महिन्यांत मी एकही गृहमंत्री आणि सरकारचा डाव यशस्वी होऊ दिला नाही. त्यांचा डाव यशस्वी झाला असता तर मी समाज एकत्र केला. मीच समाजाला मातीत घातलं असं झालं असतं. समजा राज्यातील सरकारने आम्हाला सहा जूनपर्यंत आरक्षण नाही दिलं तर विधानसभा निवडणुकीला संपूर्ण महाराष्ट्र काबीज करणार आहे, असाही इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Raj Thackeray । एकीकडे युतीची चर्चा तर दुसरीकडे भाजपने राज ठाकरेंना दिला सर्वात मोठा धक्का

Spread the love