
Maratha Reservation Update । मराठा आरक्षणावरून राज्याचे वातावरण चांगले तापल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. 20 जानेवारीपासून मुंबईमध्ये आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी केली आहे. त्याचबरोबर या उपोषणात तीन कोटी मराठा बांधव सहभागी होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मात्र आता गुणरत्न सदावर्तें यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मुंबईत विरोध दर्शवला आहे.
Manoj Jarange Patil । मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांना दिला सर्वात मोठा इशारा
20 जानेवारीनंतर मुंबई आझाद मैदान. बीकेसी. शिवाजी पार्कवर मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची मुभा देऊ नये, अशी तक्रार ॲड . गुणरत्न सदावर्ते यांनी पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त, गृह विभाग सेक्रेटरी यांच्याकडे तक्रार केली आहे. यामुळे पुन्हा एकद गुणरत्न सदावर्तें चर्चेत आले आहेत. त्यांच्या या मागणीचा मराठा बांधवांनी निषेध केला आहे.
Sharad Pawar । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! शरद पवार निवृत्ती घेणार? निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
जरांगे यांच्या आंदोलनावर गुणरत्न सदावर्ते यांनी अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी, पोलिसांवरील हल्ले, जाळपोळ, शासकीय मालमत्तांचे नुकसान आणि मुंबईतील व्यवसायिक आस्थापना सांकेतिक भाषेत बंद पाडू अशा विविध धमक्या देणाऱ्यांना परवानगी देऊ नये असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
Laptop Under 30000 । फक्त 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये लॅपटॉप, अप्रतिम कामगिरी; वैशिष्ट्येही खास