Sharad Pawar । राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे वय 84 वर्ष असूनही ते अजूनही राजकारणामध्ये आहेत. त्यांच्या वयावरून त्यांच्यावर नेहमीच टीका केली जाते. मागच्या काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांच्या वयावरून शरद पवार यांच्यावर टीका केली होती. वय झालं तरी ते निवृत्त होत नाहीत.. कधी निवृत्त होणार? त्यांनी घरी बसून मार्गदर्शन करावे असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. आता अजित पवार यांच्या या वक्तव्यावर शरद पवार यांनी मोठं भाष्य केलं आहे.
Laptop Under 30000 । फक्त 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये लॅपटॉप, अप्रतिम कामगिरी; वैशिष्ट्येही खास
शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांच्या टीकेवरही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी काय बोलायचं यावर मी बोलू इच्छित नाही.. वयाचा हिशोब काढणे त्यांना योग्य वाटत असेल तर ते बोलू शकतात. असे शरद पवार म्हणाले आहेत.
Accident News । सरकारी अधिकाऱ्यांच्या कारचा भीषण अपघात; ४ जणांचा जागीच मृत्यू तर ५ जण जखमी
त्याचबरोबर 1967 मध्ये मी संसदीय राजकारणात आलो. त्यावेळी पासून मी एकदाही ब्रेक घेतला नाही. संसद आणि विधानसभेत सातत्याने आहे. या काळामध्ये माझ्या सक्रियते बाबत किंवा माझ्या कामाच्या पद्धतीबाबत माझ्याविरोधकांनीही कधी विषय काढला नाही असं शरद पवार म्हणाले आहेत.
Breaking News । ब्रेकिंग! आमदार अपात्रतेच्या निकालाआधीच ठाकरेंना दोन मोठे धक्के
जर वायाचाच प्रश्न असेल तर मोरारजी देसाई हे देखील जेष्ठ होते. मात्र ते काम करत होते. लोक त्यांच्यासोबत होते अनेक नेते वय वाढले तरी देखील सक्रिय होते. त्यामुळे अशा गोष्टी काढणे योग्य नाही. मी त्या खोलात जात नाही. असे देखील शरद पवार म्हणाले आहेत.
निवृत्तीनंतर कोणत्या क्षेत्रात काम कराल असा प्रश्न देखील पत्रकारांनी त्यांना यावेळी विचारला. यावर प्रतिक्रिया देत ते म्हणाले, काम करण्यासाठी मला अनेक क्षेत्रे आहेत. साखर उद्योगात मी लाईफ मेंबर आहे. काही संस्थेत मी जीवन सभासद आहे. शिक्षण संस्थेतही काम करता येतं अशा अनेक संस्थांमध्ये काम करता येतं. असं शरद पवार यांनी निवृत्तीच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे.