
Maratha Reservation । मागच्या चार-पाच महिन्यापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे सुरू असलेले आंदोलन आता संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. याचं कारण असं की, मराठा समाजातील कुणबी नोंदी असणाऱ्या सर्वांना आणि त्यांच्या संगेसोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. राज्य सरकारकडून ही मागणी मान्य करण्यात आल्याची माहिती देखील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
Sushil Kumar Shinde । ब्रेकिंग! काँग्रेसला पुन्हा मोठा झटका बसणार? दिग्गज नेता भाजपच्या वाटेवर
एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. सकाळी 11 नंतर राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेऊन त्यांना ड्रॉफ्ट दाखवणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर अधिसूचना निघणार आहे. मनोज जरांगे यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत मात्र कुणबी नोंदीसाठी सगेसोयरे हा शब्द टाकण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. यासाठी ते मुंबईत 26 जानेवारी पासून उपोषण देखील करणार आहेत. लाखो मराठा बांधव 26 तारखेला मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यापूर्वीच तोडगा काढण्यासाठी हालचाली राज्य सरकारकडून सुरू करण्यात आल्या आहेत. गुरुवारी राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.
राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना ड्रॉफ्ट दाखवणार आहे. त्यामुळे आंदोलनाबाबत आज अंतिम तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जरांगे यांनी सुचवलेल्या दुरुस्त्यांसह अधिसूचना काढण्यात येणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन संपणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Sushil Kumar Shinde । ब्रेकिंग! काँग्रेसला पुन्हा मोठा झटका बसणार? दिग्गज नेता भाजपच्या वाटेवर