Thackeray group । ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का; बड्या अधिकाऱ्याला अटक

Adity Thackeray

Thackeray group । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. बीएमसी कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाले आहे. सुरज चव्हाण हे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे अतिशय जवळचे मानले जातात. त्यामुळे आदित्य ठाकरेंना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

Sushil Kumar Shinde । ब्रेकिंग! काँग्रेसला पुन्हा मोठा झटका बसणार? दिग्गज नेता भाजपच्या वाटेवर

ठाकरे गटाच्या महापत्रकार परिषदेत देखील सुरज चव्हाण उपस्थित होते मात्र ईडीने त्यांना काल कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अटक केल्याची माहिती मिळत आहे. सुरज चव्हाण यांची याप्रकरणी आधी चौकशी देखील झाली आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांच्या या अटकेमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

Crime News । मोठी बातमी! जिल्हा उपाध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या, मुलीला पळवून नेण्यासाठी आले होते

माहितीनुसार, आज सुरज चव्हाण यांना कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. त्यांना ईडीच्या विशेष पीएमएल कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी कोर्टात ईडीकडून सुरज चव्हाण यांची कोठडीची मागणी देखील केली जाणार आहे. त्यामुळे आता ईडीच्या वकिलांकडून कोर्टामध्ये काय मुद्दे मांडले जाणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Crime | हृदयद्रावक घटना! पतीने पत्नीची हत्या करून मृतदेहाचे ६ तुकडे नाल्यात फेकले; समोर आलं धक्कादायक कारण

Spread the love