Accident News । अपघाताच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण हे वाढतच चालले आहे. दररोज कुठे ना कुठे हा अपघात घडतच आहे. मागच्या काही दिवसापासून अपघात होण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या देखील एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावरील देहूरोडजवळ ॲम्बुलन्सला भीषण अपघात झाला आहे.
Thackeray group । ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का; बड्या अधिकाऱ्याला अटक
माहितीनुसार, पुणे-बेंगलोर महामार्गावरील देहूरोडजवळील असलेल्या किवळे गावाजवळ ॲम्बुलन्सला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ॲम्बुलन्सचा चालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सुदैवाने ॲम्बुलन्समध्ये पेशंट नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने ॲम्बुलन्स निघाली होती. मात्र यावेळी चालकाचा ॲम्बुलन्सवरील ताबा सुटला आणि ॲम्बुलन्स डिव्हायडरला धडकली आणि भीषण अपघात झाला.
Sushil Kumar Shinde । ब्रेकिंग! काँग्रेसला पुन्हा मोठा झटका बसणार? दिग्गज नेता भाजपच्या वाटेवर