Maratha Andolan । नवी मुंबईत जरांगे पाटील दाखल, आज मोठा निर्णय होणार?

Maratha Andolan

Maratha Andolan । मराठा समाजाचा भव्य मोर्चा गुरुवारी रात्री मुंबईत पोहोचला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी धडपड करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासह लाखो मराठा बाधंवांनी मुंबईत धडक दिली आहे. आंदोलकांची संख्या एवढी होती की, नवी मुंबईतील रस्ते जाम झाले. रात्री मनोज जरांगे यांच्यासह मराठा बांधवांनी वाशी या ठिकाणी एपीएमसी मार्केटमध्ये मुक्काम केल्याची माहिती मिळत आहे.

Manoj Jarange Patil । जरांगेंच्या जेवणात जुलाबाचं औषध टाकलं जाऊ शकतं? बड्या नेत्याने व्यक्त केली शंका

मराठा बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त ठेवला होत. नवी मुंबई महापालिकेने देखील मराठा बांधवाना सहकार्य केल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिकेने पाण्याचे टँकर तसेच फिरते शौचालय सुविधा उपलब्ध करून दिली.

Manoj Jarange Patil । ब्रेकिंग! मनोज जरांगे यांची मोठी फसवणूक? झोपेत असताना कागदपत्रांवर घेतली सही?

दरम्यान, आज वाशी या ठिकाणी मनोज जरांगे यांची जाहीर सभा होणार असून या सभेनंतर ते मुंबईतील आझाद मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. त्यामुळे मुंबईतील रस्त्यांना आंदोलनाचे स्वरूप येण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. एकीकडे जरांगे आझाद मैदानाकडे आंदोलनासाठी निघणार आहेत तर दुसरीकडे त्यांची मनधरणी करण्यासाठी शिंदे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

Manoj Jarange । अखेर समोर आली मनोज जरांगे यांच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमागील खरी कहाणी, साडेतीन वाजता…

माहितीनुसार, गुरुवारी सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. आज पुन्हा एकदा सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. त्यामुळे आता नेमकं या भेटीत काय तोडगा निघणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Ram Ramdir । पहिल्याच दिवशी भाविकांकडून राम मंदिराच्या दानपेटीत कोट्यवधींचं दान, किती आले पैसे?

Spread the love