Maratha Aarakshan । ब्रेकिंग! जरांगे पाटील मुंबईत पोहोचण्याआधीच मराठ्यांना आरक्षण मिळणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Maratha Reservation

Maratha Aarakshan । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलकी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आता चांगलेच आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ते थेट आज लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. यासाठी जोरदार तयारी देखील करण्यात आली असून सकाळपासून जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा बांधवांची गर्दी देखील पाहायला मिळत आहे. काहीही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे.

Ayodhya Ram Mandir । राज्य सरकारचा मोठा निर्णय! अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर

मराठा आंदोलकांची ही बाब लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. दुपारी तीन वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षां निवासस्थानी ही बैठक पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (CM Eknath Shinde on Maratha reservation)

Sharad Pawar । रोहित पवारांना ईडीची नोटीस येताच शरद पवार यांनी दिली संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले; ‘राज्यात लवकरच ईडी..

आज होणाऱ्या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत अंतिम चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांसह लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल होण्याआधीच राज्य सरकार मराठा आरक्षणावर तोडगा काढणार का? हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Kishori Pednekar । बिग ब्रेकिंग! किशोरी पेडणेकर यांनाही ईडीचं समन्स, नेमकं कारण काय?

Spread the love