Ayodhya Ram Mandir । संपूर्ण देशासाठी २२ जानेवारी हा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण राज्यात येत्या सोमवारी म्हणजेच २२ जानेवारीला अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ram Mandir) संपन्न होत आहे. आत्तापासूनच संपूर्ण देशात या सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय. अयोध्येमध्ये या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. (Latest marathi news)
श्री राम जन्मभूमी ट्रस्टने देशभरातील हजारो दिग्गजांना या सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं असून मंदिर ट्रस्ट या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते राम मंदिर उद्घाटन आणि रामलल्ला प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त राज्य सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज याबाबत सामान्य प्रशासन विभागाने एक पत्रक काढले आहे. (Ram Mandir in Ayodhya)
Kishori Pednekar । बिग ब्रेकिंग! किशोरी पेडणेकर यांनाही ईडीचं समन्स, नेमकं कारण काय?
दरम्यान, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे येत्या २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी केली होती. आता त्यांची ही मागणी राज्य मंत्रिमंडळाने मान्य केली आहे. सुट्टीबाबत राज्य सरकारकडून अधिकृत परिपत्रक काढले आहे. तुम्ही अयोध्येतील सोहळा टीव्हीवर पाहू शकता.
Manoj Jarange Patil । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील करणार राजकारणात एन्ट्री?