Manoj Jarange । अजित पवार यांना मनोज जरांगेंचं आवाहन; म्हणाले ‘पवारांनी चार-पाच…’

Manoj Jarange's appeal to Ajit Pawar; Said 'Pawar four-five...'

Manoj Jarange । जालना : आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाजाकडून (Maratha Reservation) बऱ्याच वेळा आंदोलन करण्यात आले. परंतु अजूनही त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण रद्द केले केल्याने सरकारविरोधात मराठा समाजात नाराजी पसरली आहे. सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात आंदोलन (Manoj Jarange Patil Protest) सुरु आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा १४ वा दिवस आहे. त्यांनी कालपासून पाणी पिणं आणि औषधं त्यागलं आहे. (Latest Marathi News)

World Cup 2023 । टीम इंडियाच्या चिंता वाढल्या! आशिया कप स्पर्धेदरम्यान बड्या खेळाडूला मोठी दुखापत

राज्य सरकारकडून अजूनही मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. मराठा आरक्षणाचा लवकरात लवकर निर्णय घ्या, त्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या भूमिकेकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) आवाहन दिले आहे.

Crime News । सुखी संसारात पडला मिठाचा खडा अन् घडलं भलतंच.. जाणून तुम्हीही हैराण व्हाल

“अजित पवार यांना आता आम्ही विनंती करतो की, त्यांनी चार-पाच पक्षांना एकत्रित करून आरक्षणाचा विषय लावून धरावा. मराठा समाजाला आरक्षण मिळवून गोरगरिबाचं कल्याण करावं. आमची एवढीच मागणी आहे. आम्ही तुमच्यासमोर नाक घासायला मागे पुढे पाहणार नाही. गोरगरिबांना न्याय द्यावा,’ असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar । पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांचं काय होणार? शरद पवार स्पष्टच बोलले, म्हणाले; “त्यांचा…”

Spread the love