Sharad Pawar । राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) मोठी दरी निर्माण झाली आहे. बोटावर मोजण्याइतपत आमदार आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी आहेत. परंतु त्यांनी न डगमगता पुन्हा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. अजित पवार गटाने त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले तरीही त्यांनी आपले मत बदलले नाही. (Latest Marathi News)
पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांचं काय होणार? असा सवाल अनेकांना पडतो. आता त्यावर खुद्द शरद पवार यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. “शिवसेना (Shivsena) आणि भाजपशी (BJP) हतमिळवणी करत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीचे नेते परत आले तर काय करायचे? असे अनेकजण मला विचारतात. परंतु हा विषय त्यांनी डोक्यातून काढून टाकावा. मी यासंदर्भात आता कोणताही निर्णय घेणार नाही,” असे शरद पवारांनी स्पष्ट केले.
Ajit Pawar । “महाविकास आघाडी सरकार पडत होतं तेव्हा…”, अजितदादांनी केला मोठा गौप्यस्फोट
आगामी निवडणूकांसाठी सर्व राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरु आहे. प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाच्या बांधणीसाठी दिवसरात्र झटताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काल यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलवली होती. आगामी निवडणुकीत पक्षाला ७० ते ८० जागा मिळणार आहेत, त्यामुळे कामाला लागा अशा सूचना शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
Havaman Andaj । राज्यभर पावसाने पुन्हा घेतली विश्रांती? शेतकरी चिंतेत