Maratha Reservation । जरांगेंच्या आरोपानंतर मराठा समाज आक्रमक! बस पेटवून दिल्याने पोलिसांनी लागू केली संचारबंदी

Maratha Reservation

Maratha Reservation । जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापल्याचे पाहायला मिळत आहे. (Maratha Reservation Strike) मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अशातच आता जरांगेंच्या आरोपानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Latest marathi news)

Eknath Shinde । “खालच्या पातळीवरचे आरोप खपवून घेणार नाही” मनोज जरांगेंना मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा

जालन्यातील अंबड तालुक्यात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. (Jalna Maratha Reservation) संतप्त मराठा आंदोलकांनी (Maratha protesters) थेट बस पेटवून दिली आहे. अशातच आता या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पोलिसांनी वाढता तणाव पाहता संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Manoj Jarange Patil । जरांगे पाटील फ्रॉड, तो राष्ट्रवादीचा माणूस, 18 वर्ष सोबत असलेल्या सहकाऱ्याचा जरांगेंवर गंभीर आरोप

या परिसरात आता मराठा आंदोलकांना जाण्यास मनाई आहे, अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे. दरम्यान, या काळात दुकाने, आस्थापने बंद ठेवली जाणार आहेत. इतकेच नाही तर या भागात कोणत्याही प्रकारचे शस्त्र, स्फोटके आणि ज्वलनशील पदार्थ अशा वस्तू सोबत बाळगता येणार नाहीत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Ajit Pawar । ब्रेकिंग! अजित पवार यांचा मनोज जरांगे यांना गंभीर इशारा; म्हणाले, ‘काहीही केलं तरी…’

Spread the love