Manoj Jarange Patil । मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. जरी जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले असले तरी राज्यभर सभा घेण्यासाठी दौरा करत आहेत. यावेळी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. यामुळे राजकारण पुन्हा तापू शकते. (Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis)
ShivSena MLA Disqualification । ब्रेकिंग न्यूज! सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का
अंतरवाली सराटीमध्ये बोलत असताना जरांगे पाटील म्हणाले की, ” गुणरत्न सदावर्ते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे. गुणरत्न सदावर्ते यांना बळ मिळणार ते पुन्हा कोर्टात जाणार आहेत. फडणवीस साहेब पुन्हा जा म्हणणार, हे त्यांचं असेच सुरूच राहणार आहे,” असा धक्कादायक गौप्यस्फोट जरांगे पाटील यांनी केला आहे. यावर फडणवीस काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Sharad Pawar । शरद पवारांचा अजित पवारांना मोठा धक्का! ‘त्या’ 137 पदाधिकाऱ्यांचा पुन्हा पक्षात प्रवेश
दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत. सरकार देखील याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, असे आरोप सतत जरांगे पाटील करताना दिसत आहेत. याच मागणीसाठी जरांगे पाटील हे उद्यापासून जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात संवाद बैठका घेऊन ते मराठा समाजाशी संवाद साधतील.
Sharad Pawar । “…तर कोणालाच सोडणार नाही”, शरद पवार यांचा गंभीर इशारा