Sharad Pawar । आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तयारीसाठी राष्ट्रवादीचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचे समर्थक पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. आज शरद पवार यांनी लोणावळ्यात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत अजित पवार गटातील अनेक कार्यकर्ते शरद पवार गटात परतले आहेत.
Ajit Pawar । अजित पवार गटाने वाढवले भाजपचे टेन्शन!
शरद पवार यांनी सुनील शेळके यांना कडक इशारा दिला आहे. पवार लोणावळ्यात म्हणाले, तुमच्या अर्जावर माझी स्वाक्षरी आहे हे लक्षात ठेवा. भविष्यात असे काही केले तर मला शरद पवार म्हणतात हे विसरू नका. मी त्या दिशेने जात नाही, पण गेलो तर कोणाला सोडणार नाही.
सभेला संबोधित करताना शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “भाजप हे वॉशिंग मशीन आहे, आरोप करा आणि पक्षात मिसळून धुवून काढा, भाजप सत्तेचा दुरुपयोग करत आहे.’ आपल्या भाषणात शरद पवार यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या अशोक चव्हाणांवरही निशाणा साधला. तसेच त्यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.