Sharad Pawar । “.. तर मला शरद पवार म्हणतात हे विसरू नका,” शरद पवारांनी भरला अजितदादांच्या आमदाराला दम

Sharad Pawar

Sharad Pawar । आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha election) तयारीसाठी राष्ट्रवादीचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचे समर्थक पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. आज शरद पवार यांनी लोणावळ्यात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत अजित पवार गटातील अनेक कार्यकर्ते शरद पवार गटात परतले आहेत. (Latest marathi news)

Manoj Jarange Patil । ‘तो माणूस देवेंद्र फडणवीसांचा….’; मनोज जरांगे पाटील यांनी केला धक्कादायक गौप्यस्फोट

या सभेमध्ये शरद पवार यांनी दमदाटीवरुन अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके (Sunil Shelke) यांना गंभीर इशारा दिला आहे. “तुमच्या अर्जावर माझी स्वाक्षरी आहे हे लक्षात ठेवा. भविष्यात असे काही केले तर मला शरद पवार म्हणतात हे विसरू नका. मी त्या दिशेने जात नाही, पण गेलो तर कोणाला सोडणार नाही.” असा इशारा शरद पवारांनी दिला आहे.

ShivSena MLA Disqualification । ब्रेकिंग न्यूज! सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का

तसेच शरद पवार यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्ला केला. “सध्या भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणली हीच मोदींची गॅरेंटी आहे, भाजप हे वॉशिंग मशीन आहे, आरोप करा आणि पक्षात मिसळून धुवून काढा. महाराष्ट्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) येऊन गेले. ते म्हणाले की, ५० वर्षे शरद पवार महाराष्ट्रावर बसले आहेत. मी त्यांचा आभारी आहे, कारण त्यांनी मला लोकांनी ५० वर्षे निवडून दिलं हे मान्य केलं, अशी खिल्ली शरद पवारांनी उडवली आहे.

Sharad Pawar । शरद पवारांचा अजित पवारांना मोठा धक्का! ‘त्या’ 137 पदाधिकाऱ्यांचा पुन्हा पक्षात प्रवेश

Spread the love