
Maratha Reservation । मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation Strike) मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मागील काही दिवसांपासून चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या केल्या आहेत. पण पुन्हा एकदा मनोज जरांगे आमरण उपोषण करणार आहेत. (Latest marathi news)
मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि मराठा आरक्षण लागू व्हावं, यासाठी आमरण उपोषण (Manoj Jarange Patil Strike) करणार आहे; असे मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. तसेच त्यांनी सरकारच्या अधिसूचनेवरुन टीका करणाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. ‘काही जण सरकारची सुपारी घेऊन सोशल मीडियावर (Social media) ट्रॅप करत आहेत. त्यांना पद पैसे हवे आहे,’ असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
”सरकारने सगेसोयऱ्यांच्या बाबतीत येत्या १५ तारखेला अधिवेशन बोलावलं आहे. त्यानुसार मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळेल. या कायद्याची अमलबजावणी होण्यासाठी १० तारखेपासून मी पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहे. यापूर्वी मी समाजासाठी मरायला तयार होतो, आता मराठा समाजातील जे लोक विरोधात लिहित आहेत त्यांच्यासाठी मरायला देखील तयार आहे. त्यांनीही १० तारखेनंतर अंतरवाली सराटीमध्ये येवून बसावं”, असंही आवाहन जरांगे पाटलांनी केलं आहे.”
Ganpat Gaikwad Firing । बिग ब्रेकिंग! गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय