Nana Patole । नाना पटोलेंची नाराजी महाविकास आघाडीला भोवणार? म्हणाले; “आघाडीचा धर्म…”

Nana Patole

Nana Patole । सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Loksabha election) रणधुमाळी सुरु आहे. अनेक पक्ष त्यांच्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. काही जागांवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे पक्षांतर्गत वाद देखील चव्हाट्यावर येत आहेत. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली नाराजी तीव्र शब्दात व्यक्त केली आहे. (Latest marathi news)

Shrikant Shinde । अखेर संपला कल्याण लोकसभेचा सस्पेन्स, देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला ‘हा’ उमेदवार

“सांगली आणि भिवंडीची उमेदवारी जाहीर करताना वरिष्ठ नेत्यांकडून महाविकास आघाडीचा धर्म पाळला जात नाही. आम्ही हायकमांडला प्रस्ताव दिला असून आता ते जे सांगितले ते आम्ही मान्य करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दोन जागा आणि मुंबईतील एका जागेचा प्रश्न होता. अजूनही वेळ गेली नाही. यावर विचार करावा,” असा सल्ला नाना पटोले यांनी दिला आहे.

Sanjay Raut । उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! संजय राऊत भाजपच्या बड्या नेत्याच्या भेटीला, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

“सांगली आणि भिवंडीत काही करू नका, नाहीतर तिकडे त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे आधीच बैठकीत आपण सांगून आलो होतो. त्यानंतरही भिवंडीत शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केला आहे. विदर्भामध्ये आम्ही ठाकरे गट आणि शरद पवार गटाला सांभाळून घेतले. पण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात वेगळे निर्णय घेतले जात आहेत,” असेही नाना पटोले म्हणाले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीला नाना पटोलेंची नाराजी भोवणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Pune Lok Sabha । काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर, फ्लेक्सवर नेत्याचा फोटो न टाकल्याने मंडपवाल्याला मारहाण

Spread the love