Sanjay Raut । उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! संजय राऊत भाजपच्या बड्या नेत्याच्या भेटीला, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

Sanjay Raut

Sanjay Raut । सांगली : राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election) पार पडणार आहेत. एकीकडे राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत तर दुसरीकडे तिकीट नाकारल्याने काही नेते पक्षांतर करत आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे भाजपच्या बड्या नेत्याच्या भेटीला गेले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest marathi news)

Pune Lok Sabha । काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर, फ्लेक्सवर नेत्याचा फोटो न टाकल्याने मंडपवाल्याला मारहाण

महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून वाद सुरु आहेत. ही जागा सोडण्यास काँग्रेस (Congress) तयार नाही. या जागेवर उमेदवार जाहीर करताना आम्हाला विश्वासात घेतलेले नाही. ही जागा काँग्रेसला मिळाली नाही तर आम्ही चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. तसेच संजय राऊत यांच्या सांगली दौऱ्यावेळी काँग्रेस नेते गैरहजर राहिले होते. ठाकरे गटालाही ही जागा पाहिजे आहे.

Devendra Fadnavis । शरद पवारांना बसणार सर्वात मोठा धक्का! देवेंद्र फडणवीसांनी घेतली सुप्रिया सुळेंच्या प्रचार प्रमुखाची भेट

भाजपाने सांगलीतून संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil) यांना उमेदवारी जाहीर केली असून याला भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) यांनी विरोध केला आहे. संजय राऊत यांनी जत येथे विलासराव जगताप यांची भेट घेतली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, संजय राऊत आणि विलासराव जगताप यांच्या भेटीत कोणती चर्चा झाली? हे अजून स्पष्ट झाले नाही.

Eknath Shinde । निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली; या ठिकाणी बसणार मोठा धक्का

Spread the love