
Bjp । सध्या पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती मिळत आहे. भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील काँग्रेसने केली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर भाजपने पुण्यात विकसित भारत या पुस्तकाचे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. (Pune News )
Nana Patole । नाना पटोलेंची नाराजी महाविकास आघाडीला भोवणार? म्हणाले; “आघाडीचा धर्म…”
पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये भाजपकडून या पुस्तकाचे वाटप करण्यात आलं होतं. मात्र यावेळी आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यासचा आरोप काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केला आहे. भाजपच्या संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई करा अशी मागणी देखील काँग्रेसने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे केली आहे.
Shrikant Shinde । अखेर संपला कल्याण लोकसभेचा सस्पेन्स, देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला ‘हा’ उमेदवार
दरम्यान, निवडणूक आयोगाने 16 मार्चला लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या असून सात टप्प्यात मतदान होणार आहे. 4 जूनला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच आता आचारसंहिता देखील लागू झाली. मात्र पुण्यामध्ये भाजपकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.