Nashik News । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाच्या अंतिम टप्प्यात निवडणूक आयोगाने नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे. नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये 5 कोटी रुपयांची रोकड सापडली आहे, ज्यावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने छापेमारी केली. यावेळी एका राजकीय पक्षाच्या नेत्याची गाडीही जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई विधानसभेच्या प्रचाराच्या अंतिम दिवशी करण्यात आल्याने राज्यातील राजकारणात नवा वाद उभा राहिला आहे.
Raosaheb Danve । ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर रावसाहेब दानवे यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
निवडणूक आयोगाच्या पथकाने आज सकाळी नाशिकमधील एक प्रसिद्ध हॉटेलवर छापेमारी केली. हॉटेलच्या एका खोलीतून 5 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या रोकडीसोबतच एका गाडीला देखील ताब्यात घेतले असून त्या गाडीतील इतर कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला चौकशीसाठी नेले आहे. चौकशी करत असताना पोलिसांना अनेक प्रश्नांचा सामना करावा लागत आहे, जसे की ही रक्कम कुठून आणली गेली, ती का आणली आणि ती कोणाला दिली जात होती.
नाशिकमध्ये ही कारवाई करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या पथकाने राज्यभरात सुरू असलेल्या इतर कारवायांची माहितीही दिली आहे. शनिवारी मुंबईत 80 कोटी रुपयांची चांदी जप्त करण्यात आली होती, तसेच नागपूर आणि जळगावमधून देखील मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी जप्त करण्यात आले आहे. नागपूरमधून 14 कोटींचं सोने आणि चांदी जप्त करण्यात आले, तर जळगावमधून 5 कोटी 59 लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोने-चांदी जप्त केली गेली आहे.
Politics News । ब्रेकिंग! महिलांच्या खात्यात १ तारखेला तीन हजार रुपये येणार? बड्या नेत्याची घोषणा