Mumbai News । धक्कादायक बातमी! वडिलांचा पीएफ मागितल्यावर कंपनीच्या एचआरने मुलीकडे केली सेक्सची मागणी

Mumbai News

Mumbai News । सध्या मुंबईमधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या मृत वडिलांची पीएफची रक्कम घेण्यासाठी मुलगी कार्यालयात पोहचली यावेळी त्या मुलीसोबत तेथील मॅनेजरने गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एचआर मॅनेजरने मुलीला पीएफची रक्कम देण्याच्या बदल्यात तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली.

Arvind Kejriwal । सर्वात मोठी बातमी! दिल्लीत लागू होणार राष्ट्रपती राजवट?

याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र आरोपी व्यवस्थापकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय तरुणी वांद्रे येथे घरकाम करते. २०१५ साली मुलीच्या वडिलांचे निधन झाले. मात्र तिचे वडील एका कंपनीमध्ये काम करत होते. यावेळी त्यांच्या पगारातून पीएफ कापला जात होता. तोच पीएफ घेण्यासाठी मुलगी कंपनीत गेली असता मॅनेजरने तिच्यासोबत गैरवर्तन केले आहे.

Vijay Shivtare । चिन्ह कमळ का असेना, पण बारामतीतूनच लढणार, विजय शिवतारेंमुळे वाढले अजितदादांचे टेन्शन

पीएफची रक्कम घेण्यासाठी मुलीने सर्व कागदपत्रे जमा केली तरीही तिला पीएफची रक्कम मिळाली नाही. तिचे वडील काम करत असलेल्या खाजगी कंपनीत तिने याबाबत तक्रार केल्यावर तिने एचआर मॅनेजरची भेट घेतली. पीएफ फाइल एचआर मॅनेजरकडे होती. मुलीने संपूर्ण समस्या एचआर मॅनेजरला सांगितली. मात्र त्याऐवजी एचआर मॅनेजरने तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली.

Sanjay Raut । संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ! दाखल झाली निवडणूक आयोगाकडे तक्रार, नेमकं प्रकारण काय?

मी तुझे काम करीन पण बदल्यात तुला माझ्यासोबत सेक्स करावे लागेल असे सांगितले. हे समजताच तरुणी तेथून थेट पोलिस ठाण्यात गेली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

Sharad Pawar । अजित पवारांकडं गेलेले अनेक जण आपल्याकडं येणार, शरद पवारांचा मोठा दावा

Spread the love