Lok Sabha Result 2024 । शरद पवारांविरुद्ध बंड करणे अजित पवारांना भोवणार? बारामतीही हातातून जाणार?

Ajit Pawar

Lok Sabha Result 2024 । अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात जोरदार झटका बसताना दिसत आहे. त्यांचा पक्ष केवळ एका जागेवर आघाडीवर आहे. सकाळी 11.15 च्या ट्रेंडनुसार रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे 15869 मतांनी आघाडीवर आहेत. मात्र बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्या मागे आहेत. त्यामुळे बारामती अजित पवारांच्या हातातून जाणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Shirur Election Results । शिरूरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! अमोल कोल्हेंनी आढळरावांना टाकलं मागे

भाजपचे हे उमेदवार पुढे आहेत

गुजरातमध्ये भाजप 11 जागांवर आघाडीवर आहे. धुळ्यात सुभाष राव भामेर, जळगावात स्मिता वाघ, रावेरमध्ये खडसे रक्षा निखिल, अमरावतीत नवनीत राणा, नागपूरमध्ये नितीन गडकरी, भंडारा गोंडात सुनील बाबुराव मेंढे, पालघरमध्ये हेमंत विष्णू सावरा, मुंबई उत्तर मध्यमध्ये पीयूष गोयल, मुंबई उत्तर मध्यमध्ये उज्वल निकम, पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि अहमदनगरमध्ये सुजय राधाकृष्ण विखेपाटील आघाडीवर आहेत. नितीन गडकरी 26318 मतांनी आघाडीवर आहेत. नवनीत राणा 1515 मतांनी पुढे आहेत.

Supriya Sule । ब्रेकिंग! बारामतीतून पहिल्या फेरीत सुप्रिया सुळे आघाडीवर; अजित पवारांना धक्का

महाराष्ट्रात शरद पवार यांचा पक्ष आठ जागांवर पुढे आहे. वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीतून भास्कर बघरे, भिवंडीतून सुरेश गोपीनाथ म्हात्रे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, बीडमधून बजरंग सोनावळे, माढामधून धैर्यशील पाटील, साताऱ्यातून शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत.

BJP l सर्वात मोठी बातमी! भाजपने उधळला विजयाचा गुलाल; ‘या’ उमेदवाराने फडकावला विजयाचा पताका

Spread the love