BJP l सर्वात मोठी बातमी! भाजपने उधळला विजयाचा गुलाल; ‘या’ उमेदवाराने फडकावला विजयाचा पताका

Bjp

BJP l 2024 च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील सुरत लोकसभा जागा ही एकमेव जागा आहे जिथे निवडणुकीपूर्वीच निकाल जाहीर झाला होता. निवडणुका घेण्याची गरजच उरली नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आणि भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले.

Sharad Pawar । लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले पत्र, केली मोठी मागणी

गुजरातच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे. या जागेसाठी प्रमुख भाजपचे मुकेश दलाल यांच्यासह एकूण 11 उमेदवार रिंगणात होते. या सर्व उमेदवारांनी अर्जही दाखल केले, मात्र अर्ज माघारीच्या दिवशी नऊ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज तांत्रिक कारणावरून फेटाळण्यात आला.

Uddhav Thackeray । ब्रेकिंग! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ आदेश

दरम्यान, अशा स्थितीत भाजपचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात एकाकी पडल्याने त्यांना मतदानापूर्वीच बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करावे लागले. 2019 च्या निवडणुकीत भाजपने या जागेवर मोठा विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपच्या तिकिटावर निवर्तमान खासदार दर्शन विक्रम जरदोश या रिंगणात होत्या आणि त्यांना 7 लाख 95 हजार 651 मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे उमेदवार अशोक पटेल यांना केवळ 2 लाख 47 हजार मते मिळाली. सुमारे साडेपाच लाख मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला. 2014 च्या निवडणुकीतही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती.

Ravi Rana । ब्रेकिंग! लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी रवी राणा यांचा उद्धव ठाकरेंबाबत धक्कादायक दावा; म्हणाले…

Spread the love