Lok Sabha Elections Result 2024 । लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर देशभरात कुठे आनंदाचे तर कुठे दुःखाचे वातावरण आहे. निकालात एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले आहे. मात्र, महाराष्ट्रात एनडीएची कामगिरी फारशी चांगली नसल्यामुळे यावरून राजकीय चर्चा रंगली आहे. दरम्यान, अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या नवनीत राणा यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना त्यांनी आपल्याला मिळालेल्या मतांचा अभिमान असल्याचे सांगितले.
Maharashtra Lok Sabha Result । सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रात काँग्रेसने भाजपला दिला मोठा धक्का
भाजप नेत्या नवनीत राणा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “मी ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेतृत्वाखाली लढले, मला मिळालेल्या मतांचा मला अभिमान आहे.” मी शेवटपर्यंत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत राहीन. असं त्या म्हणाल्या आहेत.
काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला.
पूर्व महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी विद्यमान खासदार आणि भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा १९,७३१ मतांनी पराभव केला. राणा यांच्या विरोधात वानखेडे यांना ५,२६,२७१ मते मिळाली. तर नवनीत राणा यांना ५,०६,५४० मते मिळाली. महायुतीने महाराष्ट्रात एकूण १७ जागा जिंकल्या आहेत. यामध्ये भाजपला 9 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या.