Leopard attacks । अहमदनगर हादरलं! बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू

Leopard attacks

Leopard attacks । गावाकडील व्यक्तींना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे अनेकदा आपला जीव गमवावा लागतो. मागच्या काही दिवसापासून गावामध्ये, वस्तीत त्याचबरोबर शेतामध्ये बिबट्यांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये त्याचबरोबर लहान मुलांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. शेतात भरदिवसा बिबट्या शेतकऱ्यांवर हल्ला करत आहे अशा अनेक आपण घटना ऐकल्या असतील. सध्या देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे.

Ajit Pawar । मोठी बातमी! अजित पवार यांचा ‘तो’ व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल; पाहून तुम्हीही व्हाल थक्क

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात ही घटना घडली आहे. या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात एका नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे तेथील गावांवर मोठी शोककळा पसरली आहे. अथर्व प्रवीण लहामगे असे या मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

Politics News । राजकारणात मोठा भूकंप येणार? विश्वास बसणार नाहीत असे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार; राजकीय हालचालींना वेग

मागच्या अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे. वन विभागाला वेळोवेळी सांगून देखील कोणतीच दखल घेतली नाही वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे मुलाच्या मृत्यू झाला असल्याचे तेथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे. वेळीच बिबट्याला जेरबंद केले असते तर ही घटना टळली असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे मुलाच्या कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कसं कोसळला आहे.

Manoj Jarange । ब्रेकिंग न्यूज! मनोज जरांगेंचं मुंबईतील आंदोलन फसणार? गुणरत्न सदावर्तेंची मुंबई हायकोर्टात धाव

Spread the love