Manoj Jarange । ब्रेकिंग न्यूज! मनोज जरांगेंचं मुंबईतील आंदोलन फसणार? गुणरत्न सदावर्तेंची मुंबई हायकोर्टात धाव

Manoj Jarange Patil

Manoj Jarange । मागच्या काही दिवसापासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्या नाहीतर मुंबई येऊन आमरण उपोषण करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्याचबरोबर येत्या 20 जानेवारीला कोट्यावधी मराठा बांधवांना एकत्र घेऊन मुंबईत धडकणार असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान आता मुंबईमधील मनोज जरांगे पाटील यांचे हे आंदोलन फसण्याची शक्यता आहे.

Munawwar rana । मोठी बातमी! प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांचे निधन, वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पहिल्यापासूनच मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला आहे. आता पुन्हा एकदा सदावर्ते यांनी मुंबईतील मराठा आंदोलना विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. मनोज जरांगे पाटील सरकारला वेठीस धरत असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा अशी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात केली आहे.

Viral News । धक्कादायक घटना! देवाची कान पकडून माफी मागितली अन् थेट मूर्ती चोरून पळून गेला

त्यामुळे आता मुंबई हायकोर्ट या याचिकेवर काय निर्णय देणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याआधी देखील हेमंत पाटील यांनी देखील जनहित याचिका दाखल केली होती. मात्र हाय कोर्टाने हेमंत पाटील यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्ट काय निकाल देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Parbhani Accident News । स्कॉर्पिओ आणि दुचाकीचा अतिशय भीषण अपघात; पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबद्दल हायकोर्टात धाव घेतल्याने मराठा आंदोलकी पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Spread the love