Kirit Somayya । “तर घाटकोपरमध्ये 14 जणांचे प्राण वाचले असते…”, किरीट सोमय्या यांचा धक्कादायक दावा

Kirit Somayya । मुंबईतील घाटकोपर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. मोठे होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला तर 74 जण जखमी झाले. आता या घटनेवर भाजप नेते किरीट सोमय्या यांचे वक्तव्य समोर आले आहे.

Unseasonal Rain | पावसाचं रौद्ररुप! धक्कादायक व्हिडीओ समोर

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी बीएमसीला पत्र लिहून घाटकोपरमध्ये लावण्यात आलेल्या बेकायदा होर्डिंगबाबत तक्रार केली होती. यानंतर बीएमसीने ईजीओ मीडियाला नोटीसही दिली होती, मात्र काही कारवाई होण्यापूर्वीच काल मोठी दुर्घटना घडली. या अपघातात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. किरीट सोमय्या आज याबाबत पत्रकार परिषदही घेणार आहेत.

Highway Accident । भीषण अपघात, भरधाव वेगात असलेल्या कारची डिव्हायडर तोडून ट्रकला धडक, 6 जण जागीच ठार

पेट्रोल पंपावर 100 फूट उंच बेकायदेशीर फलक कोसळल्याने सुरुवातीला 100 हून अधिक लोक अडकले होते, त्यानंतर शोध आणि बचाव कार्य सुरू झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, होर्डिंग मालकाचे नाव भावेश भिडे असल्याचे सांगण्यात आले आहे. हे होर्डिंग बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) परवानगीशिवाय लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. घाटकोपर परिसरातील छेडा नगर जिमखान्याजवळ ही घटना घडली. पाऊस आणि सोसाट्याचा वारा यादरम्यान हा अपघात झाला.

Pune News । ब्रेकिंग! पुण्यात 7 ठिकाणी बॉम्बस्फोट होणार…त्या कॉलने उडाली सगळीकडे खळबळ

Spread the love