Highway Accident । अपघाताच्या घटना काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीत सतत कुठे ना कुठे भीषण रस्ते अपघात होत आहेत. या अपघातामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात. सध्या देखील अपघाताची एक भीषण घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेली कार दुभाजक तोडून पलीकडे पोहोचली. तेव्हा समोरून येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली आणि भीषण अपघात झाला.
हा अपघात एवढा भीषण होता की कार कित्येक मीटरपर्यंत घसरली. उत्तप्रदेशमधील हापूर या ठिकाणी हा अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रवाशांच्या मदतीने मृतदेह व जखमींना कारमधून बाहेर काढले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 12.30 च्या सुमारास हा अपघात झाला. कार गाझियाबादहून मुरादाबादच्या दिशेने जात होती. अल्लाहबख्शपूर टोल प्लाझाजवळ कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि दुभाजक तोडून दुसऱ्या लेनमध्ये आली.
या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या लोकांचे वय 25 ते 35 वर्षांच्या दरम्यान आहे. प्राथमिक माहितीनुसार हे सर्व गाझियाबादच्या लोनी भागातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
Nilesh Lanke । निलेश लंके यांनी शेअर केला पुन्हा एक धक्कादायक व्हिडीओ