किरण मानेंची ‘त्या’ तरुणांसाठी पोस्ट म्हणाले,’ मर्दुमकी दाखवल्याचा आव आणत…’

Kiran mane

दर्शना पवार (Darshana Pawar) हत्याकांड प्रकरण ताजे असताना आता सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल होत आहे. ही तरुणी दुचाकीवरून जाताना एका हॉटेलजवळ हल्लेखोराने तिच्यावर हल्ला केल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. यावर आता अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

मोठी बातमी! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

किरण माने यांनी “संपूर्ण आयुष्यभर लपून-छपून मर्दुमकी दाखवल्याचा आव आणत भेकडांसारखं जगणाऱ्यांपेक्षा, एक दिवस का होईना पण लेशपाल जवळगे व हर्षद पाटील यांच्यासारखे खरे मर्द व्हा! लेशपाल, हर्षद तुम्ही रियल लाइफ हिरो आहात, सलाम भावांनो,” अशी पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा होत आहे.

वेळ आली होती पण काळ नाही! भर पावसात असे वाचले तिचे प्राण… पहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केला असे असे सांगण्यात येत आहे. शंतनू लक्ष्मण जाधव (22 ) असे या हल्लेखोराचे नाव आहे. हल्ला झालेली तरुणी ही कोथरुड (Kothrud) परिसरात राहत असून हे दोघेही पुण्यातील (Pune) एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. दरम्यान या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

फ्लिपकार्टची भन्नाट ऑफर! Realme 11 Pro+ फोनवर मिळतोय 26,700 रुपयांचा डिस्काउंट

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *