शिंदे गटाला मोठा धक्का! हायकोर्टाने दिला ठाकरे गटाच्या बाजूने निकाल

Thackrey

शिवसेनेसोबत (Shivsena) बंड करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत (BJP) युती केली. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिला. परंतु, शिंदे-फडणवीस सरकार अजून कोसळले नाही. अशातच निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गटाला धनुष्यबाण आणि पक्ष चिन्ह दिले होते. त्यानंतर शिंदे गटाने आम्हीच अधिकृत शिवसेना आहे असे सांगत राज्यातील महापालिकांमधील कार्यालये ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी ठाकरे गटाने मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) दार ठोठावले. (Latest Marathi News)

किरण मानेंची ‘त्या’ तरुणांसाठी पोस्ट म्हणाले,’ मर्दुमकी दाखवल्याचा आव आणत…’

ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी या कार्यालयावर आपलाच ताबा आहे असे सांगितले होते. प्रकरण जास्त टोकाला जाऊ नये म्हणून तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना (Deepali Khanna) यांच्या आदेशाने हे कार्यालय सील करण्यात आले होते. या प्रकरणी न्यायालयाने ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. म्युनिसिपल कर्मचारी दालनाचा (Municipal Karmachari Sena) ताबा आता ठाकरे गटाकडे राहणार आहे. यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

मोठी बातमी! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

न्यायालयाच्या या निकालानंतर आता म्युनिसिपल कर्मचारी सेना कार्यालय पुन्हा एकदा सुरु होणार आहे. त्यामुळे ठाकरे गटामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, राज्यात जरी शिंदे-फडणवीस सरकार आले असले तरी अजूनही सत्तासंघर्ष शांत झाला नाही. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आपल्याला कायम जुंपल्याचे दिसत आहे.

वेळ आली होती पण काळ नाही! भर पावसात असे वाचले तिचे प्राण… पहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *