Ketki Chitle । मनोज जरांगेंचे फडणवीसांवर आरोप; केतकी चितळे म्हणाली, “एका मोर्चा धारक…”

Ketki Chitale

Ketki Chitle । मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केलेल्या विधानामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जरांगे यांच्या आरोपानंतर अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान आता या प्रकरणात अभिनेत्री केतकी चितळे हिने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.आपल्या वादग्रस्त विधानांसाठी केतकी चितळे (Ketki Chitle) कायम चर्चेत असते आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने वादग्रस्त पोस्ट केली आहे.

Ajay Baraskar । फडणवीसांसोबतच्या फोटोवर अजय बारसकरांच दिल स्पष्टीकरण

कालचा दिवस फार इंटरेस्टिंग होता. एके ठिकाणी (बरीच वर्षे शिव्या घातल्यावर) ब्राह्मण तुष्टीकरण करताना स्वतःचा कानांनी ऐकले व डोळ्यांनी बघितले, आणि दुसरीकडे, काही किलोमीटर अंतरावर एका मोर्चा धारक “महापुरुषांनी” एका राजकारणी नेत्यांना ब्राह्मण म्हणून अपशब्द वापरले, अशी बातमी ऐकली! जय महाराष्ट्र असे म्हणून गप्प बसावे का या सर्कशीत असलेल्या कलाकारांवर हातातील पॉपकॉर्न फेकावे कळत नाहीये. असो. जय हिंद.. वंदेमातरम्.. भारत माता की जय.. अशी पोस्ट केतकी चितळेने शेअर केली आहे.

Pune Crime News । पुणे पुन्हा हादरलं! जंगलात नेऊन नवऱ्याने बायकोसोबत केले भयानक कृत्य; घटना वाचून बसेल धक्का

अभिनेत्री केतकी चितळे हिने तिच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अनेकांनी या पोस्टवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

Budget Session । फसवणूक नको, आरक्षण द्या; विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी

Spread the love