‘मुख्यमंत्री लेव्हलचा माणूस लहान मुलांच्या भांडणासारख्या बालिश टीका करत आहे’, एकनाथ खडसेंचा घणाघात

Khdase

सत्ता कोणत्याही पक्षाची असो, राज्यात कायम सत्ताधारी आणि विरोधक असा संघर्ष पाहायला मिळतो. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मागील काही दिवसांपासून फडणवीस हे फ्रशट्रेशनमध्ये आहेत असे दिसत आहे. त्यामुळे ते इतक्या बालिश टीका करत आहेत’, अशी बोचरी टीका खडसे यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

‘मतांच्या विभाजनासाठी KCR यांची एन्ट्री; BRS भाजपची टीम बी’ संजय राऊत यांचा आरोप

“खडसे यांनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर आज त्यांना काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती” असा आरोप फडणवीस यांनी जळगावात एका आयोजित कार्यक्रमात केला होता. त्याला खडसे (Devendra Fadnavis Vs Eknath Khadse) यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. जी जमीन मी कधीच खरेदी केली नाही त्या जमीनीत तोंड काळे करण्याचा संबंध येत नाही. सगळ्या जगाला माहित आहे मी गैरव्यवहार केला नाही, उलट त्यांनीच मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याने मला घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला.

वाजत-गाजत आली वरात अन् वरपक्षाने सांगितली ‘मन की बात’, पुढं जे घडलं ते ऐकून बसेल तुम्हालाही धक्का

‘काही दिवसांपासून फडणवीस हे फ्रशट्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे ते बालिश टीका करत आहेत. लहान मुलांच्या भांडणासारखे फडणवीस वागत आहेत. मुख्यमंत्री लेव्हलचा माणूस,मुख्यमंत्री राहिलेला माणूस, त्याने काय शब्द वापरावे आणि कुठे काय बोलावं हे त्यांना समजलं पाहिजे’, अशा शब्दात खडसे यांनी फडणवीसांचा समाचार घेतला आहे. त्यामुळे आता फडणवीस काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

‘मोदींना ‘ती’ गोष्ट पटली नसावी,’ शरद पवारांनी घेतला मोदींच्या टीकेचा खरपूस समाचार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *