
Kangana Ranaut । बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करत असते. त्यामुळेच कंगना सतत चर्चेत येत असते. नुकतीच कंगनाने एक पोस्ट शेअर केली आहे. कंगनाने इंस्टाग्राम वर स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने स्वतःचा उल्लेख बॅटमॅन असा केला आहे. (Kangana Ranaut)
कंगनाने या पोस्टच्या माध्यमातून तिच्या आरोग्याबाबत माहिती दिली आहे. पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, मागच्या बारा महिन्यात मला डेंगू, कोविड डेल्टा कोविड, ओमीक्रोन, आणि कोविड+ स्वाइन फ्लू सर्व काही झाले आहे. मी कायम आजारी आहे. कधी कधी खचल्यासारखं वाटतं निराश झाल्यासारखं सुद्धा वाटतं… अगदी बॅटमॅन सारख्या लोकांनाही असं वाटू शकतं.. चला पुढे जात जाऊयात… सर्वांना फेस्टिवल दिनाच्या शुभेच्छा अशा आशयाची इंस्टाग्राम स्टोरी कंगनाने शेअर केली आहे.

त्याचबरोबर कंगनाने अजून एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे आणि त्यामध्ये लिहिल आहे की, डाव्या आणि उजव्या दोन्ही विचारसरणीचे लोक यावर सहमत आहेत की, मी खूप वाईट स्वभावाची व्यक्ती आहे… मी हिंसक आहे मला हिंसा आवडते… मी थोडी बिघडलेली असून हट्टी देखील खूप आहे.. तसेच मी टॅलेंडेट देखील आहे. म्हणजे G.O.A.T. सारखी… यालाच म्हणतात बॅटमॅन… मी तेच आहे…’ अशी पोस्ट कंगनाने शेअर केली आहे. कंगनाच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे.
