Accident News । गणपतीसाठी निघालेल्या कुटुंबाचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! १ जणाचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

Accident on Samriddhi Highway

Accident News । समृद्धी महामार्गावरील अपघात काही केल्या कमी होत नाहीत. या महामार्गावर सतत अपघात घडल्याचे आपल्याला ऐकायला मिळते. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. या महामार्गावर अपघातामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे. प्रशासनाने ठोस पाऊल उचलून देखील अपघात थांबत नाहीत. दरम्यान, या महामार्गावर पुन्हा एक अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंगळवारी संध्याकाळी गौरीगणपती साठी पुण्याहून अमरावतीला जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला आहे. (Accident on Samriddhi Highway)

Kangana Ranaut । मागच्या 12 महिन्यापासून कंगना सतत आजारी; पोस्ट शेअर करत केला धक्कादायक खुलासा

समृद्धी महामार्गावर वाहनांचे टायर फुटून, चालकाचे नियंत्रण सुटून, त्याचबरोबर वन्यप्राणी आडवे जाऊन अपघात होतात. सध्या झालेला अपघात देखील वन्यप्राण्याला धडकून झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच तेथील लोकांनी तातडीने बचाव कार्य करत प्रवाशांना बाहेर काढले.

Pune News । नोकरीच्या बहाण्याने महिलांना सौदी अरेबियात नेलं अन् झालं असं काही की..वाचून तुम्हालाही बसणार नाही विश्वास

जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल केले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान समृद्धी महामार्गावर सर्रास वन्य प्राण्यांचा वावर असून महामार्गावरून जाणारे प्राणी अपघाताला आमंत्रण देत आहेत. या आधी देखील अनेक जणांचा वन्यप्राण्यांच्या धडकेत मृत्यू झाला आहे.

Devendr Fadanvis । अजित पवारांना लांडग्याचे पिल्लू म्हणणाऱ्या पडळकरांबाबत फडणवीसांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

Spread the love