Devendr Fadanvis । अजित पवारांना लांडग्याचे पिल्लू म्हणणाऱ्या पडळकरांबाबत फडणवीसांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

Devendr Fadanvis

Devendr Fadanvis । भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अगदी खोचक शब्दात टीका केली. अजित पवार लबाड लांडग्याचं पिल्लू अशी टीका गोपीचंद गोपीचंद पडळकर यांनी केली होती. दरम्यान या टीकेनंतर अजित पवार समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. या मुद्द्यावर अजित पवार गट चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Sitaphal Diseases । सिताफळ काळे का पडतात? जाणून घ्या त्यामागील कारणे आणि उपाययोजना

यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य केले ते एकदम अयोग्य आहे अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे आहे. तिन्ही पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी तसेच आमदारांनी तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत”.

Success Story । इंदापूर तालुक्यातील युवा शेतकऱ्याने केला लाखोंचा फायदा देणाऱ्या नवीन फळाचा प्रयोग; अशी केली सुरुवात

नेमकं काय म्हणाले होते पडळकर?

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोपीचंद पडळकर यांनी पत्र पाठवल आहे मात्र अजित पवार यांची भावना आमच्याविषयी स्वच्छ नसल्याने आम्ही त्यांना पत्र पाठवले नाही असे गोपीचंद पडळकर म्हणाले. त्याचबरोबर ते लबाड लांडग्याचे पिल्लू आहे असे देखील ते म्हणाले. त्याचबरोबर यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यावरून देखील टीका केली आहे. ते म्हणाले ही लबाड लांडग्याची लेक बोलते त्यावर फार लक्ष देण्याची गरज नाही असा घणाघात पडळकर यांनी केला आहे.

Gardening Tips । घराजवळ लावाल ‘ही’ झाडे तर वाढेल सापांचा धोका; वाचा महत्वाची माहिती

Spread the love