Kangana Ranaut | लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आणि अभिनेत्री कंगना राणौतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कंगनाची जीभ घसरली आणि तेजस्वी यादवला तेजस्वी सूर्या म्हटले आहे. एका जाहीर सभेला संबोधित करताना कंगना राणौत म्हणाली, तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात आणि मासे खातात. तेजस्वी सूर्या हे भाजपचे नेते आणि बेंगळुरू दक्षिणमधील खासदार आहेत. त्यामुळे आता कंगनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Viral Video । ट्रकखाली मुलगी आली, पुढे काय झाले ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का; पाहा भयानक व्हिडीओ
एका रॅलीदरम्यान कंगनाने तेजस्वी यादव यांचं नाव घेण्याऐवजी तिने चुकून तिच्याच पक्षातील म्हणजेच भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांचं नाव घेतलं. हिमाचल प्रदेशातील एका रॅलीदरम्यान तिने हे वक्तव्य केलं. शनिवारी तिच्याच मंडी मतदारसंघात या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. आता सगळीकडे या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.
Ajit Pawar । “..तर अजित दादांनी आत्ताच मिशा काढाव्यात”, श्रीनिवास पवार यांचे वक्तव्य
विरोधकांवर टीका करताना कंगना म्हणाली, “ही बिघडलेल्या शहजादांची पार्टी आहे. मग ते राहुल गांधी असो, ज्यांना चंद्रावर बटाटे उगवायचे असतील किंवा मग ते तेजस्वी सूर्या असो जे गुंडगिरी करतात आणि मासे खातात.” सध्या कंगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. सगळीकडे या व्हिडिओची चर्चा सुरु आहे.
Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांनी शिवसेना तुटण्याचे सांगितले खरे कारण; केला मोठा गौप्यस्फोट
Tejasvi Surya – Mujhe Kyu Toda.. 🤣 pic.twitter.com/jK46bwXwNu
— Narundar (@NarundarM) May 4, 2024