Ajit Pawar । बारामती मतदारसंघात (Loksabha Election) यंदा अटीतटीची लढत पार पडणार आहे. कारण पहिल्यांदाच या मतदासंघात नणंद विरुद्ध भावजय असा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार (Supriya Sule Vs Sunetra Pawar) यांच्या लढतीत कोणाचा विजय होणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दोन्ही उमेदवारांकडून या ठिकाणी थेट जोरदार प्रचार केला जातोय. बारामतीची निवडणूक म्हणजे या नेत्यांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे.
Prashant Bhoir । धक्कादायक! राष्ट्रवादी आमदाराच्या स्वीय सहाय्यकाला ट्रकनं चिरडलं; जागीच मृत्यू
अशात अजित पवार यांचे मोठे भाऊ श्रीनिवास पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. अजित पवार यांच्या वक्तव्याला त्यांनी प्रत्युत्तर दिल आहे. अजित पवार शनिवारी म्हणाले होते की, सध्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासोबत प्रचारात दिसत असलेला एकही जण 4 जूननंतर दिसणार नाही, जर एकही जण दिसला तर माझ्या मिशा काढेन, असं अजित पवार म्हणाले होते. या वक्तव्यानंतर अजित पवार यांचे श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Srinivas Pawar । अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचा मोठा गौप्यस्फोट; राजकारणात खळबळ
काय म्हणाले श्रीनिवास पवार?
याबाबत बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले, “अजित दादा शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी फक्त जे म्हटलंय ते लक्षात ठेवावं. त्यांनी जर सर्व पवारांबाबत असं काही बोललं असेल तर त्यांनी 4 जूनपूर्वीच मिशा काढायला हव्यात. दादांनी दिलेला शब्द पाळावा.”, असं श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Raj Thackeray । राजकीय वर्तुळातून मोठी बातमी! राज ठाकरेंचं सर्वात मोठं वक्तव्य; म्हणाले, “भाजपने…”