Jodhpur Train Accident । पाळीव कुत्र्याने घेतला बहीण-भावाचा जीव, घडलं भयंकर; वाचून बसेल धक्का

Dog Attack

Jodhpur Train Accident । पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अशा अनेक घटना देखील आपण ऐकतच असतो. सध्या देखील जोधपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी पाळीव कुत्र्यामुळे बहीण भावाला आपला जीव गमवावा लागला आहे. जोधपूर बनार कॅंट रेल्वे स्थानकापूर्वी बनार रोडवर बांधलेल्या रेल्वे ट्रॅकच्या तात्पुरत्या मार्गाने दोन भाऊ-बहीण शाळेतून घरी परतत होते. यावेळी काही पाळीव कुत्र्यांनी त्यांचा पाठलाग केला. त्यामुळे ते घाबरले आणि रेल्वे रुळाच्या दिशेने धावले. त्यानंतर रुळावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या मालगाडीने त्याला धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Pune Metro । थरकाप उडवणारी घटना! मृत्यू अवघ्या 30 मीटर अंतरावर, पुणे मेट्रो ट्रॅकवर ३ वर्षाच्या मुलासह आई पडली…

ही घटना जोधपूरच्या माता पोलीस स्टेशन परिसरात घडली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनन्या आणि युवराज सिंग हे भाऊ-बहीण होते. दोघेही बनार येथील गणेशपुरा येथील रहिवासी होते. बनार परिसरातील आर्मी चिल्ड्रन अॅकॅडमीमध्ये हे दोघेही पाचवी आणि सातवीच्या वर्गात शिकत होते. हे दोघेही इतर तीन मित्रांसह शाळेतून परतत होते. वाटेत काही पाळीव कुत्र्यांनी त्यांचा पाठलाग केला. मुले घाबरून पळू लागली. धावत-पळत दोन मुले रेल्वे रुळावर पोहोचली. यादरम्यान अनन्या आणि युवराज यांना मालगाडीने धडक दिली.

Manoj Jarange Patil । मुंबईला जाण्याआधी मनोज जरांगे पाटील ढसाढसा रडले; नेमकं काय घडलं?

यांनतर त्यांच्या मित्रांनी कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. रेल्वे रुळाजवळ मृतदेह पाहून कुटुंबीयांनी आरडाओरडा सुरू केला. रडल्यामुळे अनन्याचे वडील प्रेम सिंह यांची प्रकृती बिघडली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नातेवाईक व परिसरातील नागरिकांची गर्दी होऊ लागली.

Maratha Aarakshan । ब्रेकिंग! जरांगे पाटील मुंबईत पोहोचण्याआधीच मराठ्यांना आरक्षण मिळणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Spread the love