Jammu Kashmir Accident । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! जम्मू काश्मीरमध्ये भीषण बस अपघात; २० पेक्षा जास्त प्रवासी दगावल्याची शक्यता

Jammu Kashmir Accident

Jammu Kashmir Accident । अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात होत आहेत. सध्या देखील अपघाताची एक भयानक घटना समोर आली आहे. देशातील जम्मू-काश्मीरच्या डोंगराळ राज्यात एक वेदनादायक दुर्घटना घडली आहे. किश्तवाडहून जम्मूला जाणारी बस दोडा जिल्ह्यातील आसार भागातील त्रंगलजवळ रस्त्यापासून 250 मीटर खाली घसरली असून या ठिकाणी मोठा अपघात झाला आहे.

IND vs NZ Match । टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! सेमीफायनलआधी मोठा धक्का

या अपघातात अनेकांचा बळी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव कार्य सुरू करण्यासाठी आणि दुर्घटनेचा अंदाज घेण्यासाठी पोलिस आणि बचाव पथकांसह स्थानिक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. डोडा येथील पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या प्राथमिक अहवालात मृतांची संख्या २० किंवा त्याहून अधिक असू शकते. (Jammu Kashmir Bus Accident )

Jayant Patil । मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची प्रकृती बिघडली

पोलिस नियंत्रण कक्ष दोडामधील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “किशतवाडहून जम्मूला जाणारी एक प्रवासी बस दोडा जिल्ह्यातील आसार भागातील त्रंगलजवळ रस्त्यापासून उलटली आणि दुसऱ्या रस्त्यावर 250 मीटर खाली पडली. “अनेक प्रवाशांचा मृत्यू होण्याची भीती आहे.” या घटनेमुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Sharad Pawar । कथित व्हायरल जात प्रमाणपत्रावर शरद पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “माझी जात सर्वांना…”

Spread the love