राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण खूप तापलं असून बऱ्याच नेत्यांनी एकमेकांवर टीका केल्या आहेत. या प्रकरणात संदर्भात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी गंभीर दखल घेतली आहे. सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्र्यांनी तातडीने या प्रकरणाची नोंद घ्यावी अशी मागणी केली होती. त्यावरच आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, राजकारण हे राजकारणापुरतच मर्यादित आहे. वैयक्तिक पातळीवर कोणासोबतही अन्याय केला जाणार नाही. कोणत्याही नेत्याला अशी धमकी मिळणं खपवून घेतलं जाणार नाही. पोलीस निश्चितच कायद्याप्रमाणे या प्रकरणावर कारवाई करतील. असे देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया देत म्हणाले आहेत.
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पिंपळकर नेमका कोण? समोर आली धक्कादायक माहिती
“भाडखाउ तुझा दाभोळकर केल्याशिवाय राहणार नाही” अशा प्रकारची धमकी शरद पवारांना ट्विटरद्वारे देण्यात आली. सौरभ पिंपळकर (Saurabh pimpalkar) या ट्विटर अकाउंटवरून ही धमकी दिली गेली आहे. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. “अशा धमक्या येणे दुर्दैवी आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
खळबळजनक! शरद पवारांनंतर आता संजय राऊत यांना देखील जीवे मारण्याची धमकी