Indapur Firing । इंदापूर गोळीबार प्रकरणात मोठं ट्विस्ट; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Indapur News

Indapur Firing । पुणे-सोलापूर बायपास रोडवरील रेस्टॉरंटमध्ये जेवण करणाऱ्या एका व्यक्तीची पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अविनाश बाळू धनवे असे मृताचे नाव आहे. तो व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर होता. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठच्या सुमारास इंदापूर येथील जगदंबा रेस्टॉरंटमध्ये अविनाश धनवे यांच्यासोबत जेवण घेण्यासाठी तिघेजण थांबले. यावेळी रेस्टॉरंटमध्ये दोन जण आले आणि त्यांनी अविनाशच्या डोक्यात थेट गोळी झाडली. गोळीबारानंतर अनेक लोक रेस्टॉरंटमध्ये आले आणि त्यांनी मृतावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या घटनेमुळे इंदापूर चांगलेच हादरून गेले आहे.

Sharad Pawar । शरद पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य; म्हणाले, “सर्वांना एकत्रितपणे कारवाई…”

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या गोळीबार प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपी निष्पन्न झाले आहेत, त्यांना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ज्याचा खून झाला तो देखील आरोपी असून हल्ला करणारे देखील रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. हे सर्व गुन्हेगार आळंदी नजीकच्या चऱ्होली परिसरातले आहेत.

Congress । ब्रेकिंग! काँग्रेसच्या बड्या नेत्याला अटक, पत्नीलाही पोलिसांनी केली अटक

अविनाश पंढरपूरला जात असताना त्याच्या मिञाशी संगनमत करून हा हल्ला झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या गोळीबाराचं सीसीटीव्ही देखील सगळीकडे व्हायरल झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश धनवे हत्याकांडातील सर्व आरोपी हे लँड डिलिंगशी संबंधित आहेत. लँड माफियांच्या टोळी युद्धातूनच हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

Eknath Shinde । ‘एकनाथ शिंदे यांच्यावर खूप वाईट वेळ येणार आहे…’ बड्या नेत्याचे धक्कादायक वक्तव्य

Spread the love