Congress । सध्या एक मोठी बातमी समोर आली आली आहे. राजस्थानमधून ही बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील फार्महाऊसला वनजमिनीवर अतिक्रमण म्हणून चिन्हांकित करण्यासाठी आलेल्या सरकारी पथकाला रोखल्याच्या आरोपावरून काँग्रेस नेते अमीन पठाण यांना रविवारी अटक करण्यात आली. यामुळे राजस्थानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. 25 वर्षे भाजपमध्ये राहिल्यानंतर अमीन पठाण (Amin Pathan) यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अमीन पठाण हे काँग्रेसच्या राजस्थान युनिटचे सरचिटणीस आहेत.
Eknath Shinde । ‘एकनाथ शिंदे यांच्यावर खूप वाईट वेळ येणार आहे…’ बड्या नेत्याचे धक्कादायक वक्तव्य
अमीन पठाण, त्यांची पत्नी रझिया पठाण आणि इतर काही जणांवर सरकारी अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करणे, ‘गुन्हेगारी शक्ती’ वापरणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे, असे अनंतपुरा पोलिस स्टेशनचे मंडळ अधिकारी (सीआय) भूपेंद्र सिंह यांनी सांगितले.
Indapur Crime । इंदापूरात गोळीबार झाल्यानंतर आरोपी कसे झाले फरार? धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर
अमीन पठाणच्या पत्नीवरही गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अमीन पठाण, त्यांची पत्नी आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३३२ (लोकसेवकाला दुखापत करणे) आणि ३५३ (लोकसेवकाला कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी फौजदारी शक्ती) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
Elvish Yadav । बिग ब्रेकिंग! यूट्यूबर एल्विश यादवला पोलिसांकडून अटक
पोलिसांनी सांगितले की, अमीन पठाण याना रविवारी सायंकाळी येथील न्यायालयात हजर केले असता, तेथून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश देण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पठाण यांनी जामीन अर्ज दाखल केला होता, मात्र तो फेटाळण्यात आला होता.