Indapur Crime । इंदापूरात गोळीबार झाल्यानंतर आरोपी कसे झाले फरार? धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर

Indapur Crime

Indapur Crime । इंदापूरमधील झालेल्या गोळीबारामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली असून त्या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला. या हत्येची दृश्य खुपच भयानक आहेत. सोशल मीडियावर या हत्येचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल जगदंबा प्युअर व्हेजमध्ये ही घटना घडली आहे.

Elvish Yadav । बिग ब्रेकिंग! यूट्यूबर एल्विश यादवला पोलिसांकडून अटक

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी हत्येनंतर गाडीमधून बसून फरार होताना दिसत आहेत. हॉटेलच्या बाहेर लावलेल्या गाड्यांमध्ये बसून आरोपींनी पळ काढला. ही घटा थरारक असून परिसरातील लोकांमध्ये पूर्णपणे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. न्यूज १८ मराठी या वृत्तवाहिनीने देखील ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Indapur News । रिव्हॅाल्व्हर लोड केले, पाठीमागून कोयते घेऊन 5 जण आले, इंदापूरमधील गोळीबाराचा नवीन व्हिडीओ समोर

हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृताचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हत्येचे कारण समजू शकले नाही. या खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना घडली तेव्हा लोक हॉटेलमध्ये जेवण करत होते. हत्येदरम्यान लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली होती.

Sanjay Shirsat । आता रोज नवीन धमाके होणार; शिंदे गटाच्या नेत्याचं सर्वात मोठ वक्तव्य

Spread the love