Goregaon Fire । धक्कादायक बातमी! मुंबईमधील गोरेगावातील पाच मजली इमारतीला भीषण आग; ६ जणांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी

Goregaon Fire

Goregaon Fire । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई येथील गोरेगाव परिसरामधील एका इमारतीला गुरुवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. गोरेगाव परिसरामधील समर्थ नावाच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. माहितीनुसार या आगीमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. (Mumbai News)

Sanjay Raut । संजय राऊत यांना मोठा धक्का! धाकट्या भावाला नोटीस; नेमकं प्रकरण काय?

या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या ठिकाणी आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र या घटनेमुळे तेथील परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Supriya Sule । अजितदादा मुख्यमंत्री झाल्यावर पहिला हार मी घालेन; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव परिसरामध्ये समर्थ नावाची जवळपास पाच मजली इमारत आहे. या ठिकाणी पार्किंगला भीषण आग लागली पाहता पाहता आगीने संपूर्ण इमारतीला विळखा घातला त्यामुळे यामध्ये राहणारे अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्यास सुरुवात केली.

Jayant Patil । “अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आमच्या संपर्कात” जयंत पाटलांच्या दाव्याने उडाली सर्वत्र खळबळ

दरम्यान या आगीमध्ये जखमी रुग्णांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. या आगीमध्ये पार्किंग मधील लावलेल्या सर्व गाड्या जळून खाक झाल्या आहेत. त्याचबरोबर तळमजल्यावरील काही दुकाने देखील जळून खाक झाली असल्याची माहिती मिळत आहे.

Sharad Pawar । शरद पवार यांनी केला मोठा गौप्यस्फोट म्हणाले, “अजित पवार यांना भाजपसोबत जाण्यासाठी मी परवानगी…”

Spread the love